दार उघड उद्धवा, दार उघड : भुसावळात मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे आंदोलन


भुसावळ : राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी सकाळपासूनच भुसावळसह राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा भाजपाने घेतला आहे. भुसावळ शहर भाजपातर्फे शहरातील मंदिरे उघडण्यासाठी जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिरासमोर आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार विरोधात टाळ, घंटा, शंख वाजवत आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, शैलजा पाटील, अजय भोळे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, गिरीश महाजन, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, नारायण रणधीर, सुरेश शर्मा, अर्जुन खरारे, सुरेश कुटे, मुकुंदा निमसे, सुनील सोनवणे, पवन बुंदेले, बिसन गोहर, गिरीश पाटील, प्राफविलास अवचार, नरेंद्र बर्‍हाटे, शिशिर जावळे, धनराज बाविस्कर, राहुल तायडे, चंद्रशेखर पाटील, प्रशांत देवकर, मंगेश पाटील, राम माहुरकर, प्रसन्न पांडे, संतोष आव्हाड, युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी, श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर, चेतन बोरोले, अमित असोदेकर, चेतन सावकारे, गोपीसिंग राजपूत, अथर्व पांडे, मयूर अंजाळेकर, मयुर सावकारे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !