जळगावात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
जळगाव : 13 वर्षीय विधी संघर्षीत बालकाने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना एका भागात घडली. या प्रकरणी संशयीत मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील एका भागात सात वर्षीय मुलगी आपल्या आईवडील व भावासोबत राहते तर संशयीत 13 वर्षीय मुलगा आपल्या आत्याकडे राहतो. रविवार, 29 ऑगस्ट रोजी दुपारी 13 वर्षीय विधीसंघर्षीत मुलाने 7 वर्षीय चिमुकलीला घराच्या छतावर नेत तिच्यावर अत्याचार केला. पीडीत मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगण्यात आला. या प्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांनी रविवारी रात्री शनीपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून शनीपेठ पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

