जळगावात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची उद्या बैठक


भुसावळ : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, जळगाव जिल्हा ग्रामीणची विस्तृत बैठक संघटनात्मक बाबींवर तसेच बूथ कमेटी व इतर कार्यक्रमाविषयी आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली जळगावातील ब्राह्मण सभेच्या सभागृहात शुक्रवार, 3 रोजी सकाळी 10 वाजता होत आहे. या बैठकीला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, हर्षल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीस भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीणचे सर्व जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सर्व मंडळ अध्यक्ष, मंडळ सरचिटणीस यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल, जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश्वर साळवे, जिल्हा सरचिटणीस सुबोध वाघमारे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत निकम यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !