भोसरी भूखंड प्रकरणी माजी मंत्री खडसेंसह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल
मुंबई : भोसरी येथील भूखंड प्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीतर्फे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांचे जावई गिरीश चौधरी आणि सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गिरीश चौधरी अटकेत असून मंदाताई खडसे यांना समन्स बजावण्यात आले.
ईडीने केले आरोपपत्र दाखल
भोसरी येथील भूखंड प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात अडचणीत वाढ झाली होती. या प्रकरणी ईडीने आधी त्यांची चौकशी केली होती. यानंतर 5 जुलैपासून त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे अटकेत आहेत तर खडसे यांच्या सौभाग्यवतील मंदाताई खडसे यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांनी चौकशीसाठी वेळ मागून घेतली आहे. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज आधीदेखील फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. तर शुक्रवारी ईडीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.




