लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचे ठरले : …. या पक्षात करणार प्रवेश!


मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. गुरुवार, 16 सप्टेंबर रोजी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुरेखा पुणेकर अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार(-क्षळीं झरुरी) यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील. सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याचं नेहमी बोललं जायचं. मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं. तेव्हापासून सुरेखा पुणेकर राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित होतं. राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातून 61 तोळे सोन्याची चोरी 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !