भुसावळातील आवटे कुटुंबियांकडील गणरायाची आमदार निलेश लंकेच्या हस्ते आरती
रुग्णवाहिकेचे लोर्कापण : माजी नगरसेवक राजेंद्र आवटेंसह परीवाराने कोरोना योद्धे आमदार निलेश लंकेचे केले जोरदार जल्लोषात स्वागत
भुसावळ : विकासकामांच्या उद्घाटनासाठी भुसावळात आलेले पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांनी भुसावळातील स्नेही तथा माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्याकडे सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार तथा कोरोना योद्धे निलेशजी लंके यांच्याहस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी उपस्थित होते.
आमदार लंके भुसावळात आवटे कुटूंबियांकडे मुक्कामी
पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके हे भुसावळातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे आप्तेष्ट असल्याने रविवारी रात्रीच आवटे कुटुंबियांकडे मुक्कामी दाखल झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळीदेखील आमदार लंके यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.



आमदारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
प्रसंगी स्व.मधुकर भिका वाघ यांच्या स्मरणार्थ सोमवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार निलेश लंके यांच्याहस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक राजेंद्र दत्तू आवटे व समाज सेवक संजय दत्तु आवटे यांच्या मार्गदर्शनाने लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी गांधी नगर परीसरातील शंभूराजे चौक,गडकरी नगर आणि विविध ठिकाणी आमदार निलेशजी लंके यांचा सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी राकेश ठाकरे, शिव कैथवास, किशोर टोके, कल्पेश महाजन, अभिजीत सोनार, महेश पटेल, सुनील जैन, विशाल महाजन, गौरव आवटे, योगेश वाघ, लाजरस मणी, राज रैक्वार, जय तोकडे, अंकुश वावरे, प्रथमेश आवटे, शुभम भांडे, अतुल बढे, शुभम अहिरे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादा पवार म्हणाले ; पक्षात अनेक येतात अन् जातात, पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही

