रेल्वे प्रकल्पांना निधी न देण्याचे राज्याचे धोरण आडमुठेपणाचे : देवेंद्र फडणवीस


औरंगाबाद : राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 50 टक्के स्वहिस्सा देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. परीणामी, सर्व प्रकल्प बंद झाले आहेत. ते सुरू करायचे असतील तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय बँक परीषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

प्रकल्पांना लागला ब्रेक
28 हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राज्यात घेतले जाणार होते.
परंतु राज्य सरकारने 50 टक्के हिस्सा देण्यास नकार दिल्याने हे प्रकल्प आता पुढे जाऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री असताना महारेल कॉर्पोरेशन गठीत करून 100हून अधिक रेल्वे पुलांचे बांधकाम पूर्ण केले होते. तसेच रेल्वेचे विविध प्रकल्प आता बंद झाले आहेत. सुरेश प्रभू आणि पीयूष गोयल रेल्वेमंत्री असताना मंजूर केलेले प्रकल्प राज्य सरकारच्या आडमुठे धोरणाने बंद पडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. समृद्धी महामार्गाबरोबरच रेल्वे मार्गाचाही प्रस्ताव समृद्धी महामार्गालगतच रेल्वेचेही काम सुरू करता येईल का ?, याची चाचपणी सुरू केली असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, या पद्धतीने रेल्वेमार्ग नेण्यासाठी 38 टक्के जमिनीचे नव्याने संपादन करावे लागेल, असे आपणास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेचे दुहेरीकरण, विद्युतीकरण यावर लक्ष देत असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. हा धागा पकडून फडणवीस यांनी समृद्धी महामार्गालगत असा प्रकल्प करण्यासाठी राज्य सरकारचेच मोठे आव्हान उभे असेल.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !