भुसावळातील अट्टल चैन चोरटा जावेद अली एमपीडीखाली स्थानबद्ध


आंतरराज्यीय चैन चोरट्यावर कारवाईने खळबळ : औरंगाबाद गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ : महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात धूम स्टाईल चोर्‍या करणार्‍या भुसावळातील अट्टल गुन्हेगार जावेद उर्फ लंगअली गरूअली इराणी (30, पापा नगर, इराणी मोहल्ला, भुसावळ) यास एक वर्षांसाठी एमपीडीएखाली स्थानबद्ध करण्यात आल्याने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद गुन्हे शाखेने ही कारवाई करीत आरोपीला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

भुसावळातील गुन्हेगारी रडारवर
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यापूर्वीच टोळ्यांसह अनेकांची हद्दपारी करण्यात आली असून आगामी काही दिवसात गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !