संतापजनक : पतीच्या सांगण्यावरून मित्राचाही विवाहितेवर अत्याचार
अहमदनगर : अपत्य प्राप्तीसाठी पतीने मित्रासोबत संबंध ठेवण्यास विवाहितेस भाग पाडल्याची संतापजनक घटना पाथर्डीत घडली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पतीसह त्याचा मित्र अशा दोघांवर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. दोघा नराधमांना अटक करण्यात आली. एक वर्षापूर्वी विवाहितेचे लग्न झाले होते. त्यानंतर आठच महिन्यात पती त्रास देऊ लागला. त्यामुळे विवाहिता आई-वडिलांकडे रहायला गेली होती. मागील महिन्यात विवाहिता पाथर्डी तालुक्यातील तिच्या आजोबांकडे राहण्यास आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच तिचा पती आजोबाच्या घरी आला. तिला पुन्हा सासरी नांदायला घेऊन आला. 22 सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास पत्नी झोपलेली असताना पती त्याच्या मित्रासोबत घरात आला. मूल होण्यासाठी मित्रासोबत शरीरसंबंध ठेव, असे पतीने सांगितले. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर पती व मित्राने पत्नीला बळजबरीने दोन गोळ्या दिल्यानंतर पती, मित्र यांनी अत्याचार केला, असे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
मूल होण्यासाठी धक्कादायक प्रकार
मूल होण्यासाठी मित्राबरोबर दररोज संबंध ठेव, असे पतीने बजावले. ही बाब कुणाला सांगितली तर जीवे ठार मारेल, अशी धमकी विवाहितेला देण्यात आली. दुसर्या दिवशी 23 सष्टेंबरला रात्री दहा वाजता पती व त्याचा मित्र दोघेही घरी आले. त्यांनी दोघांनी पुन्हा आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार फोनवरून आई-वडिलांना सांगितला, असे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.








