विटनेरच्या मूकबधीर शेतकरी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव : तालुक्यातील विटनेर येथील मुकबधीर 39 वर्षीय तरुणाने 10 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी झाल्याने शेतात विषारी औषध सेवन केले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात 19 दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री सुनील बोबडे तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्जाच्या विवंचनेत केले विष प्राशन
विटनेर येथील मुकबधीर सुनील जगदेव बोबडे नावाच्या तरुण शेतकर्‍याने शेतात कपाशी लागवड केली होती मात्र कपाशीवर लाल्या रोग व पाऊस जास्त झाल्यामुळे नुकसान झाले. सुनीलने स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते. शेतात पीक येणार नाही म्हणून काही दिवसापासून तो नैराश्यात होता. शुक्रवार, 10 रोजी दुपारी शेतात जाऊन शेतकर्‍याने विषारी औषध सेवन केले. कुटुंबियांना ही बाब लक्षात आल्यानंतर मोठ्या भावाने लोकांच्या मदतीने त्याला जळगाव शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले. 19 दिवस उपचार सुरू असताना सोमवारी रात्री शेतकर्‍याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जळगाव शासकीय रुग्णालयातील सीएमओ डॉ. श्रावणी हुंबे यांनी खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील प्राथमिक तपास हवालदार सचिन मुढे, छगन तायडे हे करीत आहे. सुनील बोबडे यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी असा परीवार आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !