पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून
बंगळुरू : पत्नीचे परपुरूषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीच्या डोक्यात शिरल्याने पतीने पत्नीची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पसार झाला. बंगळुरूच्या बी.आर. कांताराजू असे आरोपीचे नाव आहे. आपल्याच दोन नातेवाईकांशी पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा त्याला संशय होता. हे दाम्पत्य काही नातेवाईकांसह चिक्कबंगळुरू आणि आसपासच्या भागांत तीन दिवसांच्या सहलीला गेले होते. तिथे गाण्याच्या तालावर सर्वच जण नाचत होते. कांताराजूची पत्नी रूपा हीदेखील त्यात सहभागी झाली. ज्या दोघांशी तिचे संबंध असल्याची शंका त्याला होती, तेही त्यावेळी नाचत होते. त्यामुळे तो मनातून खूपच संतापला.
भांडणात पत्नीच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर
सहलीनंतर दाम्पत्य घरी आले आणि कांताराजूने पत्नीशी भांडायला सुरुवात केली. “तू त्यांच्याबरोबर का नाचत होतीस, त्यांचे आणि तुझे काय संबंध आहेत”, असे सवाल त्याने केल्याने भांडण वाढले. त्याच रागात त्याने पत्नीच्या पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसला. पत्नी रूपा तिथेच कोसळली. तिच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होते. पण कांताराजूने तिला डॉक्टरांकडे न नेता वा उपचार न करता तेथून पळ काढला.



