देवगिरी चित्र साधनातर्फे पटकथा लेखन स्पर्धा


भुसावळ : भारतीय स्वातंत्र्याचा (75 वर्षे) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देवगिरी चित्र साधनातर्फे पटकथा लेखकांसाठी पटकथा लेखन स्पर्धेचे आयोजन मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे.

या स्पर्धेत आपल्या पटकथेचा 5 ते 7 मिनिटांचा लघुपट (शॉर्ट फिल्म) होऊ शकेल अशी आणि 5 ते 10 सीन्स असतील अशी पटकथा लिहून स्पर्धा समन्वयकांकडे पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




स्पर्धेसाठी असे आहेत विषय
स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी, डॉ.केशव बळीराम हेडगेवार हे सहा विषय देण्यात आले आहे. आपल्याला वरीलपैकी एका महापुरुषांच्या जीवनातील कुठल्याही प्रसंगांवर आधारित पटकथा लिहायची आहे.पटकथेला कुठल्याही भाषेचे बंधन नाही. विजेत्या पटकथा लेखकांना चित्रपट क्षेत्रातील नामवंत दिग्दर्शकांकडे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. पटकथा स्विकारण्याची अंतिम तिथी 5 डिसेंबर 2021 असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक योगेश सोमण हे स्पर्धेचे परीक्षक असतील. दरम्यान, पटकथा पीडीएफ, व्हॉटसअ‍ॅप वा ईमेलच्या माध्यमातून पाठवता येणार आहे.

14 रोजी मार्गदर्शन सत्र
स्पर्धेचे परीक्षक आणि मार्गदर्शक योगेश सोमण यांचे पटकथा लेखन ह्या विषयावर मार्गदर्शन सत्र रविवार, 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी स्पर्धा समन्वयक भूषण खैरनार (98909-04772) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रांत संयोजक किरण सोहळे, प्रांत सह संयोजक विनीत जोशी, सदस्य गौरव नाथ, विभाग संयोजक अनिल भोळे, विभाग सह संयोजक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, भुसावळ संयोजक विरेंद्र पाटील, सह संयोजक पंकज जोशी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !