कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या : दुईतील घटना


मुक्ताईनगर : तालुक्यातील दुई येथील ज्ञानेश्वर नारायण पाटील (45) या शेतकर्‍याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 8 रोजी घरी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, आत्महत्या ही नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे झाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यासह राज्यात शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !