किनगावात माजी विद्यार्थ्यांनी दिला 27 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा

माजी विद्यार्थी मेळावा हा सेवा निवृत्त झालेल्या आम्हा शिक्षकांसाठी उर्जा देणार : गुरूजणांचाही सन्मान


यावल : माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून सेवनिवृत्त झालेल्या आम्हा सर्व शिक्षकांना आम्ही जणू आजही सेवा देत आहोत आणि ही मुलं आजही आमच्या समोर वर्गात आहेत, असा भास होत आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते. विद्यार्थ्यांच्या अशा उपक्रमामुळे आमचे आरोग्य अधिक सुदृढ होत आहे, असे आम्हाला जाणवते असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक व्ही.बी.पाटील यांनी केले. ते किनगावात 1994 मध्ये इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार केला.

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
किनगाव, ता.यावल येथील नेहरू विद्यालयातील 1994 मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी एकत्र येत स्नेह मेळावा आयोजित केला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी.पाटील होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शिक्षक पी.जी.पाटील, जी.एम.महाजन, आर.एस.सोनवणे, आर.एस.पाटील, ए.एफ.पाटील, पी.एन.सुरवाडे, एन.बी.मोरे, शिक्षिका सरोज पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या त्यावेळेच्या सर्व शिक्षक यांना एकत्र बोलावून विशेष म्हणजे त्यांच्या अर्धांगिनीचा देखील सत्कार केला. सपत्नीक झालेल्या या सत्काराने उपस्थित शिक्षक भारावले. या कार्यक्रमांमध्ये सैनिक जवान विजय धांडे, मधुकर ठाकूर, दीपक पाचपोळे, हुसेन तडवी यांना देखील सन्मीत करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात बोलतांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी.पाटील हे अतिशय भाऊक झाले.




यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने अजीत तडवी, विद्यार्थीनींच्या वतीने शीतल झांबरे-जावळे, दिलीप पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रवींद्र ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप सुरवाडे व शेवटी आभार नथ्थू महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर तडवी, वसंत सोनार, नितीन धांडे, शब्बीर पटेल, मधूकर लोहार, मुकेश गुरव, धनराज तेली, पांडुरंग महाजन, प्रमोद पाटील, भावडू पाटील, जगदीश कोळी, विजय धांडे, उल्हास सिंगणूरकर, योगेश पाटील, टेनूराम चौधरी, सुनील बारी, प्रदीप महाजन, युवराज शिरसाडे, ज्योती भोलाणे, ललिता पाटील, किर्ती चौधरी, राजश्री पाटील, भावना पाटील, वैशाली वराडे आदींनी परीश्रम घेतले.

गुरुजनांची शिकवण अंगीकारली
शालेय जीवनात गुरुजनांनी दिलेली शिकवण अंगीकृत करत आज आपल्या संसारात ती उपयोगी पडत आहे. आपल्या पाल्यांचे पालन-पोषण करत असतांना त्यांना संस्कार सह आम्हास आमच्या गुरूजनांनी कशी शिकवण दिली हे आवर्जून सांगत त्यांना शिकवत आहोत व गुरूजनांची शिकवन खूपच उपयोगी पडत आहे, असे प्रसंगी मनोगतात शीतल झांबरे-जावळे हिने सांगितले. गुरुजनांचा आदर
विद्यार्थी म्हणून आजही गुरुजनांचा आम्ही आदर करतो तसेच आम्हाला माध्यमिक शिक्षणात ज्या गुरुजनांनी शिक्षणासोबत संस्कार दिले ते खूपच महत्वाचे होते आणि त्यामुळेच आज आम्ही विविध क्षेत्रात आपले सक्षमरीत्या करीअर करू शकलो, असे प्रसंगी अजित तडवी या विद्यार्थ्याने सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !