फळ पीक विम्याचा लाभ मिळावा : मुक्ताईनगरात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकर्यांना तत्काळ फळ पीक विमा भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
मे महिन्यात झालेल्या चक्री वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील फळबागा व शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी पंचनामे करण्यात आले मात्र अद्यापही काही शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. काही शेतकर्यांना दोन ते तीन हजार रुपयांप्रमाणे हेक्टरीप्रमाणे भरपाई देऊन थट्टा करण्यात आली. शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 60 हजार रुपये विमा रक्कम मिळावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अॅड.पवनराजे पाटील तसेच राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


