भुसावळ ग्रामीणमध्ये आमदार संजय सावकारेंनी घेतले मतदारांचे आशीर्वाद
भुसावळ : विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप, व राजप महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी ेवादिकांचे दर्शन घेत शुक्रवारी सकाळी साकरी गावातून प्रचारास प्रारंभ केला. या झंजावाती प्रचार दौर्यात त्यांनी साकरी, खंडाळा, मोढाळा, शिंदी, कुर्हे पानाचे, मांडवे दिगर, भिलमळी, मुसळतांडा व महादेव माळ या गावात जाऊन वयोवृद्ध ज्येष्ठ मतदारांचे आशीर्वाद घेतले व मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
देवदर्शनानंतर प्रचाराचा शुभारंभ
साकळीत शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता आमदार सावकारे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. प्रचार फेरी प्रारंभ होताच आमदार सावकारे यांनी प्रथम गावातील गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले व प्रचार फेरीस प्रारंभ केला.

यांचा होता सहभाग
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, पंचायत समितीचे सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे , पंचायत समितीचे माजी उपसभापती गोलू पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, सरपंच कांचन भोळे, ग्रामपंचायत सदस्य छोटू पालक, महेंद्र पडाव, विनोद सोनवणे, सोपान नेहते , विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र भारंबे, नारायण कोळी, किरण चोपडे, संजय चौधरी, खडका येथील संजय पाटील, दीपक भिरूड, भैय्या महाजन, दीपनगर येथील उल्हास बोरोले, शेतकी संघाचे संचालक प्रशांत निकम, अनिल महाजन, दीपक नेहेते, जितू चोपडे, मनोहर सपकाळे, विल्हाळे येथील सरपंच विजय पाटील आदी उपस्थित होते.
खंडाळा येथे घेतले विठ्ठल-रुक्माईचे दर्शन
या प्रचार दौर्यात आमदार सावकारे यांचे खंडाळा येथेही जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सावकारे यांनी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व प्रचारास प्रारंभ केला. यावेळी माजी सरपंच सतीश पाटील, सुखदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदीत सरपंचासह माजी सरपंचांचा सहभाग
शिंदी येथे प्रचार दौर्यात आमदार सावकारे यांच्या सोबत सरपंच चंद्रभागाबाई राजपूत, माजी सरपंच लीना महाजन, ग्रामपंचायत सदस्य सहीद मन्सुरी, दिलीप कोल्हे, नवलसिंग राजपूत, किरण महाजन, शरद ढाके, विशाल कोल्हे यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मिरवणुकीत आमदार सावकारे यांचे महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले तर वयोवृद्ध मतदारांनी आशीर्वाद दिले.
मोंढाळे व कुर्हे पानाचे येथे वयोवृद्धांनी दिले आशीर्वाद
या दौर्यात आमदार सावकारे यांना मोंढाळा व कुर्हे पानाचे येथे वयोवृद्धांनी आशीर्वाद दिले. कुर्हेपानाचे येथे आमदार सावकारे यांनी प्रथम गोजोरे रस्त्यावरील रेणुकादेवी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिरात जवळ शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार दौर्यात आमदार सावकारे यांच्या समवेत जिल्हा परीषदेचे माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पाटील, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, उपसरपंच वासुदेव वराडे, माजी सदस्य किशोर वराडे, जितेंद्र नागपुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंदा पाटील, भगवान नागपुरे, भाजपा पदाधिकारी किरण कळस्कर, गोपाळ बरकले, दिलीप बरकले, योगेश गांधले, दिलीप टोंगळे, श्याम बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. प्रचार दौर्यानंतर आमदार सावकारे यांनी गावात निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची परीवारांची द्वारभेट घेत सांत्वन केले. दरम्यान, मांडवेदिगर, भिलवडी तांडा, मुसाळतांडा व महादेव माळ येथेही प्रचार दौर्यातून आमदार सावकारे यांनी मतदारांशी संपर्क साधला. यावेळी आमदार सावकार यांच्या समवेत मानवाधिकार येथील सरपंच लाल जाधव, सुरेश जाधव, कैलास पवार, विक्रम पवार, विठ्ठल पवार, देशमुख पवार, शाम राठोड, युवराज पवार यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.


