बुलेट चोरटे जाळ्यात : जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी


जळगाव : शहरातील हनुमान नगरातून बुलेट चोरी करणार्‍या दोघा तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी खेडी येथून गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोयता शेखर पाटील (19, रा.पंढरपुर नगर, गोदावरी कॉलेज) व ऋतीक राजेंद्र काकडे (20, इंदिरानगर खेडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हनुमान नगरातून लांबवली होती बुलेट
शहरातील हनुमान नगरातील राजेंद्र नवल पाटील यांची एम.एच.19 सी.एच.1101 क्रमांकाची बुलेट चोरी झाल्याची घटना 14 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयीत आरोपी हे खेडी येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील यांचे पथक तयार करीत रवाना केले. या पथकाने संशयीत आरोपी कोयता शेखर पाटील (19, रा.पंढरपुर नगर, गोदावरी कॉलेज) व ऋतीक राजेंद्र काकडे (20, इंदिरानगर खेडी) या दोघांना खेडी येथून पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अटक केली. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चोरी करणारा संशयीत आरोपी शुभम उर्फ कोयता शेखर पाटील याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !