भरधाव दुचाकीची पाच वर्षीय चिमुकलीला धडक


जळगाव : वडिलांसोबत पायी जात असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने धडक देऊन जखमी केले. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर परीरसरात रेल्वे स्टेशननजीक ही घटना घटना घडली.

भरधाव दुचाकीने उडवले
सलीम सय्यद रेल्वे स्टेशन परसरात उघड्यावर कुटुंबासह राहतात. भीक मागून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. मंगळवारी सलीम सय्यद हे त्यांची मुलगी सकिना हिला सोबत घेत शिवाजीनगर परीसरातील रेल्वे स्टेशनच्या बाजुने रस्त्याने पायी जात होते. या दरम्यान सद्दाम पटेल यांच्या पानटपरीनजीक अज्ञात दुचाकीस्वाराने सकिनाला धडक दिली. या धडकेत सकिनाच्या डाव्या पायाला दुखापत होऊन ती जखमी झाली. उपचार घेतल्यानंतर सकीनाचे वडील सलीम सय्यद यांनी गुरूवारी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !