जळगावात तृतीयपंथीयाची गळफास घेत आत्महत्या


जळगाव : शहरातील मेहरुण परीसरातील रामेश्वर कॉलनीतील तृतीयपंथीयाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमी जवळील रहिवासी विक्रांत उर्फ विक्की लैला मनोहर खरकार (२०) या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर परीसरातील नागरीकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतरवत जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. या ठिकाणी त्याची वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयताच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !