यावलला विजेचा शॉक लागल्याने बैल दगावला


यावल : शहरातील बोरावल रस्त्यावर मैला डेपो परीरसरात विजेचा शॉक लागल्याने बैल जागीच गतप्राण झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. शहरातील शेतकरी नामदेव गोविंदा धनगर यांची गुरे शुक्रवारी बोरावल रस्त्यावरील पालिकेच्या मैला डेपो परिसरात चरत होती. दुपारी यातील एका बैलाचा वीज प्रवाह असलेल्या वायरला स्पर्श झाला. यामुळे शॉक लागल्याने बैल जागीच ठार झाला. यात शेतकरी धनगर यांचे 50 हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार देवेंद्र माळी, लखन काटकर, मधुकर चौधरी, संदीप धनगर, प्रकाश काटकर आदींच्या निदर्शनास आल्याने त्यांनी वायमधील वीजप्रवाह तातडीने थांबवला. त्यामुळे इतर दुर्घटना टळली. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या सुरूवातीला हा फटका बसल्याने शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !