एरंडोल शहरातील विवाहितेची आत्महत्या


एरंडोल : एरंडोल शहरातील सय्यद वाड्यातील विवाहितेने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फिरोजा अखिल पिंजारी (30, रा. सय्यद वाडा, ता.एरंडोल) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
याबाबत वृत्त असे की, फिरोजा अखिल पिंजारी (30, रा. सय्यद वाडा, ता.एरंडोल) या विवाहितेने राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास संदीप पाटील व संतोष चौधरी हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !