यावल-चोपडा रस्त्यावर खड्डे चुकवताना दोन दुचाकींची धडक : चौघे जखमी
यावल : यावल-चोपडा रस्त्यावर शहराच्या बाहेर खड्डे चुकवण्याच्या बेतात दोन दुचाकी आपसात धडकल्या या अपघातात कादर रुबाब तडवी वय 33 रा. लोहारा ता. रावेर, शाहिद खान अयुब खान वय 20, सोहिलोद्यीन लुकमोद्यीन वय 17 व सोहेल खान इस्माईल खान वय 16 तिघे रा. मौलाना आझाद नगर रावेर असे चार जण जखमी झाले. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. चोपडा रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघातास कारणीभुत ठरत असुन रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
