धरणगावजवळ जीप-दुचाकीत अपघात : एक जागीच ठार ; दोघे ठार
धरणगाव : सवारी जीप व मोटारसायकल यांच्यात अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. लोणे फाट्याजवळ ही घटना घडली.
एकाची प्रकृती चिंताजनक
अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणार्या जीपने लोणे फाट्याजवळ दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून एक जण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जीप पलटी होऊन त्यातील काहींना किरकोळ खरचटले आहे. मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूरजवळ असलेल्या मेलाणे, ता.चोपडा येथील रहिवासी असून कंडारी येथे नातेवाईकांकडे आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते. एका ओम्नी चालकाने माणुसकीच्या नात्याने 2 जणांना आयशरमध्ये व एका व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे आणले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगावी हलवण्यात आले. या सर्व प्रकारात 108 ला कॉल करून देखील गाडी जवळजवळ 1 तास उशिरा आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्पॉट वर धरणगाव पोलीस स्टेशनचे पी. आय. शंकर शेळके एपी आय पंचनामा केला असुन घटनेचा अधिक तपास पोलिस यत्रणा करत आहे

