….या कारणास्तव झाला पाचोरा आगारातील चालकाचा मृत्यू !


पाचोरा : राज्यभरात गेल्या १४ दिवसांपासून एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात एस. टी. विलिनीकरण करून घेण्यासाठी संप पुकारला असून संप काळात पगार नसल्याने हवालदिल झालेल्या नगरदेवळा येथील ४६ वर्षीय चालक दिलीप तुकाराम महाजन सोमवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तया दुर्दैवी घटनेनंतर एस. टी.चालकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दिलीप तुकाराम महाजन (नगरदेवळा, ता.पाचोरा) असे मयत चालकाचे नाव आहे. नगरदेवळा येथे सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


दिलीप तुकाराम महाजन हे गेल्या ९ वर्षांपासून चालक म्हणून सेवेत होते. गेल्या १४ दिवसांपासून संप सुरू असल्याने व संप काळात पगार मिळत नसल्याने महाजन यांच्या कुटुंबावर संकट ओढवले होते. संप काळात त्यांची वृद्ध आई व पत्नी मोलमजुरी करून संसाराचा रहाटगाडा ओढत होते. चालक दिलीप महाजन हे रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाचोरा आगारात संपात सामील झाले होते. त्यांची अचानक छाती दुखू लागल्याने ते नगरदेवळा गावी जाऊन आजारासाठी पैसे नसल्याने पत्नीस सोबत घेऊन त्यांचे नागद, ता. कन्नड येथे सासुरवाडीला गेले होते. तेथून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास गेले असता त्यांना धुळे येथील रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे रविवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, २ भाऊ, २ बहिणी, पत्नी, २ मुले , २ मुली असा परीवार आहे. त्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !