दहा हजारांची लाच भोवली : जळगावात दोघे आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात

आरटीओ अधिकार्‍यांच्या नावाने मागितली लाच : अधिकार्‍यांची होणार चौकशी


भुसावळ : आरटीओ अधिकार्‍यांच्या नावाने नावाने वाहन मालकाकडून दहा हजारांची लाच स्विकारताना दोन आरटीओ एजंट ायांना मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम राजेंद्र चौधरी (23, कोल्हे हिल्स, गॅस गोडाऊनजवळ, जिजाऊ नगर, जळगाव) व राम भीमराव पाटील ( 37, अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव) अशी अटकेतील आरटीओ एजंटांची नावे आहेत.

तक्रारीनंतर एजंट सापडले जाळ्यात
खेडी बु.॥ (ता. जि.जळगाव) येथील एका 39 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून हा सापळा रचण्यात आला होता. आरोपी एजंटानी 23 नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतल्यानंतर तिचे हस्तांतरण तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी आरटीओ अधिकार्‍यांच्या नावाने केली होती. तक्रारदाराने जळगाव ते एसीबीकडे तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला. मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी शुभम चौधरी याने जळगाव आरटीओ कार्यालयाच्या आवारात पंचासमक्ष स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांनी हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !