चाळीसगावात पुन्हा पशुधनाची चोरी
चाळीसगाव : शहरातील कोदगाव शिवारातील एकाच्या शेडमध्ये बांधलेल्या २५ हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर व परिसरात सातत्याने पशुधनाची चोरी होत असल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली असून टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पशुधन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
चाळीसगाव शहरातील कोदगांव येथील समाधान वामन चौधरी यांनी कोदगांव शिवारातील आपल्या शेतातील शेडमध्ये जर्शी वाणाची गाय बांधलेली असताना अज्ञात इसमाने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. ही घटना २२ रोजी रात्री ८ ते २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. 25 हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के..पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील हे करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह तालुक्यात पशुधनाची चोरी होत आहे. यामुळे सर्व सामान्य शेतकरी व दुग्ध व्यावसायिक हतबल झाले आहेत.
