जळगावात धावत्या रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू
जळगाव : बजरंग बोगद्याजवळील प्रेम नगराजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने 59 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजीव वसंत खडके (59, रा.लक्ष्मी नगर, प्रेमनगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू
संजीव वसंत खडके (59, रा.लक्ष्मी नगर, प्रेमनगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून नेहमीप्रमाणे बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी ते सुमारास फिरायला बाहेर पडले. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास रेल्वे लाईन ओलांडत असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रेल्वे खांबा क्रमांक 418 अप लाईनवर घडली. घटनेची माहिती मिळताच जळगाव लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. पुढील तपास लोहमार्गचे कॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे. मयत संजय खडके यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सून, नातू असा परीवार आहे.

