सिंधी कॉलनीतून ट्रॅक्टरची बॅटरी लंपास
जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परीसरात उभ्या ट्रॅक्टरमधून आठ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
दिलीप शिवप्रकाश चांगरे (60) हे नवल कॉलनी सिंधी कॉलनी शेजारी, जळगाव येथे कुटुंबीयांसह राहतात. चांगरे यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्याकडे ट्रॅक्टरही आहे. शुक्रवार, 19 नोव्हेंबर ते शनिवार, 20 नोव्हेंबर दरम्यान त्यांनी घरासमोर ट्रॅक्टर पार्किंग करून लावले असताना अज्ञात चोरट्यांनी आठ हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची एक्साइड कंपनीची बॅटरी चोरून नेली. याप्रकरणी दिलीप चांगरी यांनी मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.

