विवाहितेचा विनयभंग : आरोपीला अटक


जळगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या 29 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

29 वर्षीय महिलेचा विनयभंग
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात 29 वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. घरकाम करून उदरनिर्वाह करते. मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास विवाहिता घरात एकटी असतांना संशयीत आरोपी कमलेश बुधलदास चिमराणी (रा.जळगाव) हा बळजबरीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. संशयीत आरोपीने यापूर्वीदेखील पाठलाग करून फेसबूक व पेपरमध्ये तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली होती. याला कंटाळून विवाहितेने यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री नऊ वाजता धाव घेतली आणि तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी कमलेश बुधलदास चिमराणी (रा.जळगाव) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !