अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन अत्याचाराची धमकी
जळगाव : शहरातील कांचननगरात घरात घुसून तरुणाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला तसेच तिच्यावर अत्याचार करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सागर युवराज गवळी (रा.जळगाव) या तरूणाविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार करण्याची धमकी दिल्याचा आरोप
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई व कुटुंबियासह वास्तव्यास आहे. रविवारी रात्री अल्पवयीन मुलगी घरात असतांना सागर युवराज गवळी हा तिच्या घरात घुसला. त्याने अल्पवयीन मुलीच्या आईची ओढणी ओढली तसेच अल्पवयीन मुलगी सोडविण्यासाठी गेली असता सागर गवळी याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला तसेच अश्लिल शिवीगाळ करून मुलीवर अत्याचार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी पीडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन शनीपेठ पोलिसात सागर गवळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

