धक्कादायक ! : लग्नाला काही मिनिटे शिल्लक असताना दागिण्यांसह रोकड घेवून नवरीच रफुचक्कर !


नवी दिल्ली : लग्नाला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना नवरी दागिण्यांसह रोकड घेवून छु मंतर झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे नववधूने आपल्याच कुटुंबीयांना चकमा दिला तसेच घरातील सदस्यांना नशेचा पदार्थ टाकलेला चहा देऊन बेशुद्ध केले, त्यानंतर घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील हे प्रकरण आहे.

प्रेमसंबंधामुळे पळाली नवतरुणी
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण फिरोजाबादच्या कौशल्या पोलीस स्टेशन परीसरातील आहे. मुलीच्या मोठ्या बहिणीने सांगितले की, तिचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत पळून गेली आहे. मुलीने पळून जाण्यापूर्वी चहामध्ये काही नशेचे पदार्थ मिसळले होते. त्यामुळे नशेचा चहा प्यायल्याने कुटुंबातील 6 जण बेशुद्ध झाले, त्यांना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.





संमतीशिवाय केले जात होते लग्न
शेजार्‍यांनी सांगितले की, महिलेचे तिच्या संमतीशिवाय लग्न केले जात आहे. या लग्नासाठी ती खूश नव्हती. नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी रात्री घरात महिलांचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर सर्व शेजारी निघून गेल्यावर महिलेने घरातील सदस्यांना चहा दिला. चहा प्यायला लागताच सगळे बेहोश झाले. शुद्धीवर आल्यावर ते रुग्णालयात होते. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

लहान बहिणीसोबत वराचे लग्न
वृत्तानुसार, वधू घरातून पळून गेल्यानंतर आधी तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती न सापडल्यामुळे तिच्या लहान बहिणीसोबत वराचे लग्न लावण्यात आले. तसेच, या प्रकरणी तरुणीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !