सखी श्रावणी संस्थेतर्फे मजुरांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


भुसावळ : हजारो अनाथांना मायेची ऊब देऊन त्यांना आपलेसे करीत पोरके करून गेलेल्या स्व.सिंधुताई सपकाळ यांना येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विकास कॉलनीमधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मोलमजुरी करणार्‍या काही कुटुंबातील शिक्षण घेणार्‍या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

समाजाचे देणे लागतो म्हणून उपक्रम : राजश्री नेवे
स्व.माईंना केवळ माल्यार्पण करून श्रध्दांजली वाहण्यापेक्षा काही गरजु विद्यार्थ्यानां शिक्षणासाठी ज्या काही आवश्यक गरजेच्या वस्तु लागत आहे त्या त्यांना देणे हे आम्हा सर्व सखींना योग्य वाटले म्हणून छोटेखानी उपक्रम साजरा करीत माईंना श्रध्दांजली म्हणून कार्य केले, असे भावोद्गार संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ राजश्री नेवे यांनी मनोगतात व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माया चौधरी, स्मिता माहूरकर, मंदाकिनी केदारे, दीपा पाटील, महानंदा पाटील, शैला सावंत, रसिका माहुरकर, गो सेवक रोहित महाले, मयुर सावकारे यांच्यासह परीसरातील नागरीक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !