भुसावळात उद्या स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन
भुसावळ : शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवार, 23 रोजी सकाळी 11 वाजता बाजारपेठ पोलिस स्टेशन शेजारी प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. यावेळी गरजुंना अन्नदान, वृक्षारोपण, नगरपालिका दवाखान्यामध्ये आवश्यक वास्तूचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिकांनी व बाळासाहेबांवर प्रेम करणार्या नागरीकांनी उपस्थित द्यावी, असे आवाहन शिवसेना शहर भुसावळतर्फे करण्यात आले आहे. या निमित्ताने बाळासाहेबांच्या जीवनावर निबंध व चित्र घरूनच तयारी करून आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस
कार्यक्रम ठिकाणी विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन यावे यावेयी विद्यार्थ्यांना पारीतोषिक देण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षीससुद्धा वितरीत करण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी नगरसेवक मुकेश गुंजाळ (9823199197), उमाकांत शर्मा (नमा) (7276742714), मिलिंद कापडे (9823944145) यांच्याशी संपर्क साधण्याचे आयोजकांनी केले आहे.


