कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेसाठी भरीव निधी मिळणार

माजी मंत्री एकनाथराव खडसे ः चारठाणा येथे राष्ट्रवादी मेळावा


मुक्ताईनगर : कुर्‍हा-वढोदा परीसरावर माझे विशेष प्रेम राहिले असून गेल्या 30 वर्षांपासून या परीसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केला आहे. या परीसरातील शेती बागायती होण्यासाठी कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली व लवकरच या योजनेला भरीव निधी उपलब्ध होईल, असा आशावाद माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. काही विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करून दहशत माजवत असून महिलांना फोन करून अश्लील भाषेत बोलत आहेत. आपल्याला अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची आहे, असेही खडसे तालुक्यातील चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी-खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती विकास पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजू माळी, विलास धायडे, सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, संदीप देशमुख, रामभाऊ पाटील, सुभाष टोके, डॉ.बी.सी.महाजन, विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती होती.



सभागृहाचे लोकार्पण
यावेळी एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने इको टुरीझम निधी अंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्णत्वास गेलेल्या भवानी माता मंदिर येथील डोम सभागृहाचे आणि विठ्ठल मंदिर येथील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !