कुर्‍हा परीसरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते विकासकामांचे उद्घाटन


मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा परीसरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यात वढोदा येथे संरक्षण भिंत, मच्छिंद्रनाथ रस्त्यावरील पूल, तालखेडा येथे पेव्हरब्लॉक, रस्ता काँक्रिटीकरण यासह अन्य कामे मिळून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाप्रमुख अफसर खान, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पंकज राणे, सईद बागवान, आनंदा पाटील, संजय पाटील जिल्हा सरचिटणीस काँगेस, शिवाजी पाटील, नवनीत पाटील, राजू शर्मा, राजेंद्र हिवराळे, प्रफुल्ल पाटील, दीपक पवार, डॉ.विष्णु रोठे, सुनील बोरसे, दिनेश माळी, नितीन चव्हाण, निलेश माळी, हर्षल बडगुजर, देवा खाडे, मुकेश वानखेडे, निलेश शिरसाठ, आरीफभाई, शेषराव कांडेलकर, पंकज पांडव, सतीश नागरे, अविनाश वाढे, श्रावण धाडे, रशीद तडवी, प्रवीण कांडेलकर, अमोल पाटील, हरीदास भगत, शैलेश पाटील, योगेश मोडक, राहुल खिरळकर, जयेश वाघ, ज्ञानेश्वर तायडे, रीतेश मुळातकर, फारुख भाई, अकबर ठेकेदार, दीपक वाघ, नारायण पाटील आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्तीत होते.



आदिवासी बांधवांना रेशनकार्ड
राजस्व अभियान अंतर्गत खामखेडा येथील आदिवासी बांधवांना रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राणा मन मोहनदास पवार व कन्हैया पवार यांच्यासह सुमारे 100 आदिवासी बांधवांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !