भाजपाचे आमदार नितेश राणे पोलिस कोठडीत


सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी बुधवारी भाजपाचे आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आल्याने न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

कणकवली दिवाणी न्यायालयात सरेंडर
आमदार नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयात सरेंडर झाले आहेत. तर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे. आमदार नितेश राणे आज दुपारी तीन वाजता कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सलीम शेख यांच्या न्यायालयात हजर होण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर ते न्यायालयात शरण आल्यावर न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. यानंतर फिर्यादी पक्ष आणि राणे यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली.



अशी घडली होती घटना
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना १८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !