ओबीसी समाजाचे शत्रू नेमके कोण? हे जनतेला ठावूक

भाजपाचे नाव न घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांचा टोला


यावल : ओबीसी समाजाचे शत्रू नेमके कोण? हे जनतेला ठावूक असून भाजपने आता जाती-पातीचे राजकारण सुरू केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस,चे दर आजपर्यंत कमी तर झालेच नाही मात्र उलट महागाई दिवसागणिक वाढत आहे. मंडल आयोगाच्या शिफारसीला विरोध करून कमंडल यात्रा काढणार्‍या भारतीय जनता पक्षानी ओबीसींना आरक्षण दिले जावु नये म्हणुन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या काळात मंडल आयोगास मोठया प्रमाणावर विरोध केला शिवाय याच पक्षाने आपल्याच भारतीय जनता पक्षाला ज्या ओबीसी समाज नेत्यांनी आपल्या अथक परीश्रमातुन वाढवले त्या नेत्यांची काय अवस्था करून ठेवली हे आपण पाहत आहोत, असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सोमवारी यावलमध्ये लगावला. यावल येथील खरेदी-विक्री सहकारी संघाच्या आवारात पार पडलेल्या शरद युवा संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ईडीचा भाजपाकडून सर्वाधिक गैरवापर
मेहबूब शेख म्हणाले की, ज्या नेत्यांनी भाजपा वाढवला त्यांची अवस्था काय करण्यात आली हे सर्वांनाच ठावूक झाले आहे. एकनाथराव खडसे असो की विनोद तावडे, स्व.गोपीनाथ मुंडे असो वा चंद्रशेखर बावनकुळे किंवा पंकजा मुंडे असो यांची पक्षात आज परीस्थिती काय आहे ? हे पाहून खर्‍या अर्थाने ओबीसी समाजाचे शत्रु कोण हे आपल्याला कळेल, असेही ते म्हणाले. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात गगनाला भिडलेली महागाई, ईडीच्या नावाखाली होत असलेले अनेकांचे शोषण, कर्नाटक, मध्य प्रदेश आणी गोवा या राज्यातील काँग्रेसचे बहुमत असतांना भाजपाने सत्तेचा मोठा दुरुपयोग करून आर्थिक बळावर केलेले सत्ता परीवर्तन या विषयावर त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत खरपूस समाचार घेतला.



यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राष्ट्रवादीचे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, यावल शहराचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्दक्ष राकेश कोलते, युवकचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, फैजपूर युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील तर सूत्रसंचालन भरत चौधरी यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !