भुसावळात हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला उतरल्या रणांगणात
कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी कार्यालयात दिले निवेदन
भुसावळ : कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेतर्फे मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (बुरखा) घालण्यास बंदी घातल्यात आल्याच्या निर्णयाविरोधात शहरातील हिंदू-मुस्लिम महिलांनी प्रांताधिकारी प्रशासनाला बुधवारी दुपारी निवेदन देत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कर्नाटकात झालेल्या हिजाब प्रकरणाचा शहरातील मुस्लिम समाज मंचतर्फे निषेध करण्यात आला तसेच हिजाबचे समर्थ यावेळी करण्यात आले.
हिंदू-मुस्लीम महिलांचा लक्षणीय सहभाग
मंचच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ तहसीलदारांना निवेदन दिले. भुसावळ मुस्लिम समाज मंचचे अध्यक्ष साबीर शेख यांनी याबाबत आवाहन केले होते. यानुसार हिंदू-मुस्लिम महिलाांनी प्रतिसाद देत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. या निवेदनात प्रमुख चार मागण्या करण्यात आल्या आहेत. यात कर्नाटक सरकारने त्वरीत सूचना देवून संबंधीत शिक्षण संस्थेतील हिजाबवर लावलेली बंदी मागे घेण्यात यावी, भारतीय घटनेत कलम 25 नुसार प्रत्येक भारतीय जे स्वातंत्र दिलेले आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिक्षण संस्थांनी गदा आणता कामा नये, कर्नाटक मधील शिक्षण संस्थांना आदेश पारीत करण्यात यावे की, मुस्लिम विद्यार्थिनींसोबत विद्यार्थिनींना फ्रीडम ऑफ चॉईस देण्यात यावे त्यांना सर्वांत सोबत वर्गात बसू द्यावे. अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थिनींनी हिजाब घालून महाविद्यालयात येत आहेत. त्यांना भगवाधारी तरुणाई रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या तरुणाईवर त्वरीत कडक कारवाई करीत मुस्लिम विद्यार्थिनींना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.


यांची होती उपस्थिती
निवेदन देताना अध्यक्ष साबीर शेख, माजी नगरसेवक सलीम पिंजारी, भारती म्हस्के, अंजूम खान, स्वाती माळी, शहेर बानो, परवीन बी.शेख, हमीद गवळी, यास्मीन बानो, फिरोज खान, जुनेद खान, साजीद बागवान, अॅड. इम्रान शेख, अॅड पिंजारी, अॅड.रईस खान, अॅड.गफ्फार शेख, जानी गवळी आदींसह महिला उपस्थित होत्या.
