म्हणून आता ‘ओम पुरीचा गाल पकडला’ : भुसावळात पालकमंत्र्यांची मिश्कील टिपणी


भुसावळ : धरणगावात हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते केल्याचे विधान बोदवडमधील एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. या वक्तव्यानंतर पालकमंत्री यांनी विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वादावर पडदा पडला होता. भुसावळातील शनिवारी झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांनी त्या वक्तव्याची आठवण करून देत झालेल्या त्रासाची माहिती देत आपण तो रस्त्यांसाठीचा संदर्भ टाळला असून खराब रस्त्यांसाठी आता ओम पुरीचा गाल पकडला असून किमान आतातरी त्यावर टिका होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

भुसावळात साडेसहा कोटींच्या कामांचे उद्घाटन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारील शहरातील विविध भागात सहा कोटी 22 लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील श्रीनगर व जामनेर रोडवरील मान रेसीडेन्सीजवळ तसेच डी.एस.हायस्कूलमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ झाला.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !