भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करणार्यांविरोधात गुन्हा
पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा महापालिकेत सत्कार करण्यासाठी बेकायदा जमाव जमवून जोरदार घोषणाबाजी करून भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेत प्रवेश केला होता. यावेळी पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्या साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह 250 ते 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जगदीश मुळीक, बापू मानकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा व इतर 250 ते 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर राजकरण तापल्याचे पहायला मिळाले.


