भुसावळात क्रिकेट स्पर्धा : रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी खेळाडूंना बक्षीस देवून वाढवला उत्साह
भुसावळ : भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरू असलेल्या स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेचा मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी समारोप झाला. याप्रसंगी साकेगावच्या उन्नती संघाने अंतिम सामना जिंकत विजेतेपद पटकावले. आयोजकांतर्फे विजेत्या संघांना बक्षीस, ट्रॉफि व सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले त्यासोबतच रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी प्रत्येक संघातील खेळाडूला वैयक्तिक बक्षीस देवून त्यांचा गौरव करीत त्यांचा उत्साह वाढवला.
मान्यवरांचेही केले स्वागत
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोपप्रसंगी सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी तसेच चित्रपट निर्माते मानव सोहेल यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांचे रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी बुके देवून स्वागत केले. प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


रीपाइं जिल्हाध्यक्षांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह
रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत शिवाय त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी गरजूंना मदतीचा हातही दिला होता या शिवाय राजू सूर्यवंशी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना तीनचाकी सायकल वाटप करीत त्यांच्यातील दातृत्वाचा परीचयही दिला होता. अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे शहरात आयोजित स्व.निखील खडसे स्मृतीचषक स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सूर्यवंशी यांनी सहभागी प्रत्येक संघातील खेळाडूंना वैयक्तिकरीत्या बक्षीस देवून त्यांचा गौरव वाढवला. त्यांच्या उपक्रमाने खेळाडूदेखील भारावले.
खेळाडूंनी वाढवावा भुसावळचा नावलौकीक : राजू सूर्यवंशी
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाने आता कात टाकली असून या माध्यमातून खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध झाले आहे. खेळाडूंनी विविध खेळांच्या माध्यमातून शहराचा नावलौकीक वाढवावा शिवाय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याची आपली नेहमीच भावना राहिली असल्याचे रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी सांगितले.
