बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष निवड : सेनेचा एक तर राष्ट्रवादीचे दोन अर्ज दाखल


बोदवड : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवार, 14 रोजी अर्ज दाखल करण्याच्या 11 ते 2 या वेळेत तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेनेकडून एक तर राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात आनंदा रामदास पाटील यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला असून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादीकडून गटनेता जफर शेख व नगरसेविका योगीता गोपाल खेवलकर या दोघांची उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, शुक्रवार, 18 फेब्रुवारीला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असून यात कोण बाजी मारते हे लवकरच कळणार आहे.

सेनेकडे बहुमत
शिवसेनेकडे 17 पैकी 9 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादीला या निवडणुकीत सात जागाच मिळाल्या असल्याने राष्ट्रवादी बहुमतापासून दुर आहे. यावेळी उपविभागीय प्रांत अधिकारी रामसिंग सुलाणे, नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिजे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !