भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये विकासकामांचे उद्घाटन
माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश : आमदारांच्या स्थानिक निधीतून विकासकामांमुळे समाधान
भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील प्रभाग 20 मध्ये श्रीराम मंदिर परीसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे हे काम मंजूर करण्यात आले असून या कामामुळे या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहरातील प्रभाग 20 मध्ये श्रीराम मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे उद्घाटन रविवारी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते झाले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी होती. आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून माजी नगरसेवक महेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. यावेळी माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, युवराज लोणारी, शोभा नेमाडे, गिरीष महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, प्रकाश बतरा, अजय नागराणी, राजेंद्र आवटे, श्रीराम मंदिर ट्रस्टचे रामचंद्र ढाके, सुभाष चौधरी, कमलाकर बेंडाळे, यशवंत पाटील, रवींद्र सरोदे, प्रमोद सरोदे, नीळकंठ (पंच्छी) फालक, डॉ.किरण किरंगे, प्रा.प्रशांत पाटील, प्रकाश फालक, सुभाष फालक, सतीश ढाके आदींसह प्रभागातील नागरीक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मोहन पाटील, ललित फिरके, भुषण फालक, राहूल फालक, दीपक पाटील, कृष्णा सरोदे, कन्हैय्या धनगर, आकाश ढाके, मयुर राणे, सोपान फालक, भुरा चौधरी आदींनी सहकार्य केले.


