अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर सहकारी साखर कारखान्यासमोर मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 45 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. सुकलाल कैलास ठाकरे (45, रा.राजमहली, कुंजरी, ता.निवाली, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) (suklal kailas thakare) असे मयताचे नाव आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (bombay-agra national highways) शिरपूर सहकारी साखर कारखान्यालगत कर्मचारी वसाहतीसमोर मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 रोजी सुकलाल ठाकरे हे दुपारी शिरपूरकडून सेंधवाकडे दुचाकी (एम.पी.46 एम.व्ही. 7630) ने जात असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने सुकलाल ठाकरे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयतास महामार्ग रुग्णवाहिकेने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉ.गुलाबराव पाटील यांनी तपासणी करून सुकलाल ठाकरे (suklal kailas thakare) यास मयत घोषित केले. याप्रकरणी वॉर्डबॉय नितेश गवळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात (shirpur taluka police station) खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची (ad) नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !