भुसावळात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक वा रॅली काढल्यास गुन्हा : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे
भुसावळ : शिवजयंतीनिमित्त मिरवणूक वा रॅलीला शासनाने परवानगी नाकारल्याने कुणीही नियमांचे उल्लंघण करू नये शिवाय तसे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहितीवजा तंबी भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बुधवारी दिली. शिवजयंतीनिमित्त पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील मिटींग हॉल्मध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
कायद्यात रहा तर फायद्यात रहाचा इशारा
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी बैठकीचे प्रास्ताविक तर सूत्रसंचालन तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी केले. यावेळी शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, रुपाली चव्हाण यांच्यासह गोपनीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शासन निर्देशानुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले शिवाय मिरवणुकीला बंदी असल्याचे सांगत दुचाकी रॅलीही काढता येणार नसल्याचे स्पष्ट केले. पालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यातर्फे परवानगी न घेता लावलेले बॅनर काढून जप्त केली जातील, असािइशारा यावेळी वाघचौरे यांनी दिला.


