तरडीच्या युवकाची गळफास घेत आत्महत्या
शिरपूर : तालुक्यातील तरडी (Tardi) येथे 22 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या (Suside) केल्याची घटना बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 सायंकाळी उघडकीस आली आहे. अजय नामदेव पाटील (22, रा.तरडी ता.शिरपुर) (Ajay Namdev patil, Tardi) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. उशिरापर्यंत युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तालुक्यातील तरडी शिवारात (Tardi Sshivar) नामदेव पाटील यांची शेती असून त्यांना दोन मुले आहे. त्यांचा मुलगा अजय हा बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 रोजी शेतात गेला होता. दरम्यान सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेला स्थितीत आढळून आला.घटनेची माहिती थाळनेर पोलीसांना दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यास नातेवाईकांनी खाली उतरवून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुढील कारवाई उशिरापर्यंत थाळनेर पोलिसांकडून (thalner police) सुरू आहे.


