भुसावळातील तार ऑफिस रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ हटवा
नितीन नंदवणे यांची भुसावळ मुख्याधिकार्यांना साकडे
भुसावळ : शहरातील तार ऑफिस रस्त्यावरील दुकानदारांनी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून ते तत्काळ हटवावे, अशी मागणी नितीन जगन्नाथ नंदवणे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. महर्षि वाल्मीक कॉम्प्लेक्स तसेच तार ऑफिस रस्त्यावरील दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहन धारकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. वॉशिंग सेंटर चालकांच्या दुकानातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्याने रस्त्यावर घाण त्यामुळे डेंग्यूच डास व मच्छर तयार होवून डेंग्यू व मलेरीयाचे आजार होवून व्यावसायीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. तत्काळ अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


