बोदवडला संदल मिरवणुकीने वेधले लक्ष
बोदवड : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या न्यामतुल्ला शाहवली बाबांची उजनी दर्गा असून यात्रोत्सवानिमित्त बोदवड शहातून संदल मिरवणूक काढण्यात आली. न्यामतुला बाबांचा बोदवड आखाडा मोहल्ला भागातील गुड्डू शाह या खिदमदगाराच्या घरून संदल मिरवणूक प्रभात फेरी मार्गाने काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये नजुमी फकीर (साधू) यांनी आपले कर्तब दाखवले. उजनी येथील न्यामतुल्ला शाहवली बाबांच्या उजनी दर्ग्यावर मिरवणूक काढण्यात आली.
राज्यभरातून भाविक दाखल
जिल्ह्यातील सर्व किन्नर समाजाकडून दरवर्षीप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढून चादर चढवण्यात आली तसेच भाविकांना जेवण देण्यात आले. येथे दिल्ली, कर्नाटक, गुजरात, मुंबई, मध्यप्रदेश आदी भागातील भाविक दाखल झाले होते. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही या दर्ग्याची ओळख आहे. संदल झाल्यावर दुसर्या दिवशी उरुसाला सुरुवात होते. यंदा कोरोनामुळे कव्वालीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.


