लष्कर ए तोयबाशी संबंध उघड : शिमल्यातील पोलिस अधीक्षकांना अटक


नवी दिल्ली : शिमल्यातील पोलिस अधीक्षक अरविंद दिग्विजय नेगी (Shimla Superintendent of Police Arvind Digvijay) यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने (nia) दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली असून नेगी यांच्यावर गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह एनआयएने 5 अन्य लोकांना अटक केली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
एनआयए (nia) 6 नोव्हेंबर 2021 रोजी नोंदवलेल्या ओव्हर ग्राउंड वर्कर्स नेटवर्क प्रकरणाची चौकशी करत आहे. यामध्ये लष्करच्या दहशतवाद्यांना स्थानिक मदत पुरवल्याप्रकरणी तपास सुरू आहे. या दहशतवाद्यांना भारतात भयंकर हल्ले करण्यासाठी मदत करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एजन्सीने सहा जणांना अटक केली आहे.





कागदपत्रे लीक केल्याचा आरोप
तपासादरम्यान एजन्सीला नेगी (Shimla Superintendent of Police Arvind Digvijay) यांची भूमिका संशयास्पद वाटली. त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे. या अधिकार्‍यावर गोपनिय कागदपत्रे लीक केल्याचाही आरोप आहे. नेगीने हे दस्तऐवज ओव्हर ग्राउंड कामगारांसोबत शेअर केले होते, ज्यांचे लष्करशी संबंध असल्याचे सांगितले जाते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !