मोबाईल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
चोरीचे दहा मोबाईल जप्त : तक्रारदारांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
भुसावळ : बाजारपेठ पोलिसांनी संशयास्पद हालचालीवरून दोघा संशयीताच्या बसस्थानक भागातून मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांच्या ताब्यातून 77 हजार रुपये किंमतीचे दहा अॅन्ड्राईड फोन जप्त करण्यात आले आहेत. संशयीताकडून हे फोन चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय पोलिसांकडून आता तक्रारदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे तर संशयीतांविरोधात भादंवि 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रहिमोद्दीन शेख कमरोद्दीन (34, रजा टॉवरजवळ, पापा नगर, भुसावळ) व शायबाज खान रमजान खान (21, फैजपूर, ता.यावल) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंदक्रांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, एएसआय शरीफ काझी, हवालदार रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.े


